एक गझल_प्रवीण बाबूलाल हटकर




घातल्या ना फुंकरी जखमास कोणी; 
देत नाही प्रेरणा जगण्यास कोणी. 

बांधती आपापले अंदाज सारे;
जाणिले ना माझिया हृदयास कोणी. 

केवढी शोकांतिका शहरातली या;
देत नाही लाकडे सरणास कोणी. 

जाणतो प्रेमास मी, हेही खरे पण 
भेटला ना अंतरी पुजण्यास कोणी 

खोदतो माझ्याच मी कबरीस आता; 
यायचे नाही मला पुरण्यास कोणी. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा